आयुष्याचं सारं ( भाग -8 )

  • 4.7k
  • 2.5k

    पाऊसात भिजून विरलेलं नातं ..ढग गडगडायला सुरुवात झाली .... रेवती बाल्कनीत उभी राहून कॉफी पीत होती एवढ्यात तिचा फोन वाजला .आज बरेचं दिवसानंतर त्याचा फोन येताना पाहून रेवतीलाही ओशाळल्या सारखं झालं .... ती मनातच म्हणाली ," आली ना शेवटी माझी आठवण .... तू नाही राहू शकतं रे माझ्याविना ..." फोन उचलत विलंब न करता तिने कानाला लावला कॉफीचा घोट गिळत ती म्हणाली , " बोल ना आता .. " त्यावर जरा हळू स्वरातच तो म्हणाला , " मला तुला भेटायचं आहे आता .... " ती जरा भांबावलीच " आताचं भेटायचं आहे तुला ?? "" हो ..... का , तुला यायचं नाही ?