डिसुझाने शेखावतची फाईल पुर्ण वाचुन संपवली. दोन क्षण तो डोळे मिटुन बसला. थोड्या वेळात इन्स्पेक्टर राणा आतमध्ये आला. “सर, दिपकचा काहीच पत्ता नाही. अचानक कुठे गायब झाला अजुन तरी काहीच थांगपत्ता लागत नाहीये. आपली माणसं मागावर आहेत. बघु, सापडेलच कुठे ना कुठे तरी”, राणा “राणा….”, डिसुझा थोड्यावेळ विचार करुन म्हणाला “येस्स सर…”, राणा “ही शेखावतची फाईल वाचली मी. विचार करण्यासारखी एक गोष्ट मला जाणवली.. शेखावत इथे.. दमणमध्ये पोस्टींगला होता?” “नो आयडीया सर, मला तर ही न्युज आहे..”, राणा “हम्म, दहा वर्षांपुर्वी.. तेंव्हा तो एक हवालदार होता. कदाचीत त्यामुळे ही गोष्ट प्रकाशझोतात नाही आली नसेल..”, डिसुझा “ओह.. दॅट एक्स्प्लेंन्स हिज दमण