“अर्रे व्वा! खुद्द दिपक कुमार हजर झालेत…”, डिसुझा हसत हसत म्हणाला.. “हे तर म्हणजे असं झालं अंधा मांगे एक, भगवान दे दो!, काय राणा??” “येस्स सर.. खरं आहे…”, राणा हसण्यात सामील झाला “बसा.. दिपक कुमार.. बसा.. खुप पळापळ झाली ना.. दमला असाल बसा..”, समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत डिसुझा म्हणाला.. दिपककडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. तो शांतपणे खुर्चीत जाऊन बसला. “राणा, बेड्या घाला त्यांना आधी.. काय आहे ना, फौजी तालीम आहे.. आपल्याला उगाच कॅज्युलिटीज नकोत..”, डिसुझा राणाने दिपकचे दोन्ही हात खुर्चीच्या मागे ओढले आणि त्याला बेड्या ठोकल्या. “राणा.. तुझ्या माणसांना बाहेर थांबायला सांग.. आपल्याला जरा महत्वाचं बोलायचं आहे..”, डिसुझा राणाने बाकीच्या