३१. महाराष्ट्रातील किल्ले- ६

  • 10.5k
  • 2.8k

३१. महाराष्ट्रातील किल्ले- ६ * महाराष्ट्रातले किल्ले ५. सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. हा किल्ला सागरी सुरक्षा मिळावी म्हणून शिवाजी महाराजांनी बांधला. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून इ.स. २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. नोव्हेंबर २५ इ.स. १६६४ रोजी याचे बांधकामाला सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे प्रमुख केंद्र मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा बराच विस्तार होता. भुईकोट आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, ही गोष्ट ओळखून शिवाजी