फिरून नवी जन्मेन मी - भाग १

(14)
  • 28.8k
  • 4
  • 15.5k

फिरूनी, नवी जन्मेन मी...  भाग १ By sanjay kamble                 आज तब्बल पाच वर्षानी मी माझ्या मामाच्या गावी जाणार होतो. शेवट वर्षाच्या परीक्षा संपल्या होत्या आणि आठ दिवसावर माझ्या मामेभावाचे लग्न होते... college चे मित्र आता पुन्हा भेटतील न भेटतील, पन what's app वर सगळ्यांचे नंबर मात्र आठवणीने घेऊन ठेवलेले...सर्व मित्राची भेट घेऊन घरी परतलो.. आणि प्रवासाची आवराआवर सुरु केली.मामाच्या घरच्यांसाठी खाऊचा डबा माझ्या bag मधे ठेवत आई सांगु लागली.. " मामाला सांग, बाबांना सुट्टी भेटलेली नाही त्यामुळे आम्ही लग्नाच्या दोन दिवस आधी येतो म्हणून. "" आई माझी इस्त्री केलेली कपडे....?" अस थोडस आईवर ओरडत मी डबा