लायब्ररी - 5

  • 10.1k
  • 1
  • 5.3k

दिवसभर कॉलेज मध्ये प्रॅक्टिकल आणि सबमिशन ची गडबड चालू होती…संध्याकाळी घरी आल्या आल्या सरळ झोपायचीच तयारी केली होती की तो आठवला ,,काय करावं जावं का?? पण मीच तर त्याला बोलवलं होत आणि मीच नाही जायचं म्हणजे ते काही मला बरोबर वाटेना…संध्याकाळी तासभर मी आवरण्यात घालवला जाऊ की नको ???? शेवटी हो नाही करत मी finally आवरून bridge वर पोहोचले मी तर जवळ जवळ वीस एक मिनटं लवकर आले होते तो अजून आला नव्हता बहुतेक तशी इकडेतिकडे फिरणारी तुरळक मानस सोडली तर फारशी गर्दी तिथे नव्हती.मी ही समोरून कुणी आलं तर लगेच दिसेल अशाच  हिशोबाने बसले.नऊ वाजायला अजून दहा मिनिटे तरी बाकी