कवर फाटलेलं पुस्तक - भाग - III

  • 4.8k
  • 2.2k

कवर फाटलेलं पुस्तक भाग-III  मी-"बसने नको जाऊ, रस्त्याकडेला उभा राहून लिप्ट माग, कुणी ना कुणी लिप्ट देईल." त्याने हळूच हात खाली केला आणि काहीच उत्तर न देता निघून गेला.त्याला वाईट वाटले असेल पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी चहा बिस्किटे घेउन हॉस्पिटलच्या आवारात गेलो आणि तिच्या नवऱ्याला फोन केला पण फोन स्विच ऑफ लागत होता. मी दवाखान्यात शितलला अॅडमिट केले होते त्या रूममध्ये गेलो पण तिथं ती दिसली नाही,माझा जीव कासावीस झाला, इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कुठे शोधायची हिला? मी रुममधून बाहेर आलो आणि एका नर्सला विचारले,"इथला डिलेव्हरी पेशंट?" नर्स-"सगळे पेशंट चौथ्या मजल्यावर शिफ्ट केले आहेत. लिफ्ट कुठे आहे हे माहीत