टर्न (एक झपाटलेला रस्ता)

(16)
  • 17.4k
  • 3
  • 4.2k

by sanjay kamble****"हे काय झाल माझ्या हातुन..? तो जिवंत आहे की मेलाय.? माझी बाईक बाजुला पडलीये आणी बाईकच्या आडवा आलेला तो माणुस रस्त्यावर निपचिप पडलाय...अगदी निपचीप, जसा तो मेलाय. आता तो मेलााय की जिवंत आहे हे मला माहीत नाही. पाऊस तर धो धो कोसळतोय आणी ही भयान रात्र.. हे काय घडल माझ्या हातुन... तरी वॉचमन म्हणत होता 'रात्र झालीये, पाऊस आहे. इथच झोपा, रात्री अपरात्री या रस्त्यावर चित्र विचित्र घटना घडल्या आहेत' पन माझ्यात लय मोठा किडा. 'आता मर साल्या'. आता पोलिस कम्प्लेंट होईल, तो माणूस मेला तर भरपाई द्यावी लागेल, बाप रे काय करू आता...?"   नको नको त्या विचारांनी डोक्यात अक्षरशा: थैमान घातलय,