“सो… हे अस आहे सगळ.!!” गाडीच्या बॉनेटवरून उतरत दीपक म्हणाला. माया अजूनही गाडीच्या बॉनेटवरच बसून होती. दिपकने घड्याळात वेळ बघितली. ३.३० वाजून गेले होते. गावातील रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरु झाली होती. दुधाच्या व्हैंस, दैनिक पेपर वाहतूक करणारे टेम्पो रस्त्यावरून धावत होते. शहराला हळू हळू जाग येत होती. “आय गेस, वुई शुड लिव्ह नाऊ. साडे तीन वाजून गेले आहेत. उद्या ऑफिसला काही महत्वाच्या मिटींग्स आहेत न?” “लिव्ह द मिटींग्स.. “, माया थंड स्वरात म्हणाली मायाच्या त्या अनपेक्षित उत्तराने दीपक चमकला आणि त्याने मागे वळून पहिले. माया एकदा त्याच्याकडे बघून हसली आणि उजव्या हाताने तिने आपला काळ्या रंगाचा पार्टी गाऊन वरती घ्यायला