फास !

  • 5.3k
  • 2.4k

श्री शांतपणे सोफ्यावर कॉफीचा मग घेऊन बसला होता. 'मानसी इंडस्ट्री'चा मालक श्रीकांत, हजारो नसली तरी शेकडो कोटीची उलाढाल असलेली स्टील इंडस्ट्री. वय फक्त सत्तावीस! स्वप्नांच्या मागे धावणारा एक वेडा, अशी त्याच्या मित्रात, त्याची ओळख होती. कॉफी संपत अली होती, तोच कोठेतरी मोबाईलची रिंग झाली. तिचाच फोन असणार! नक्कीच! कारण तिच्या अस्पष्ट आवाजातले बोलणे त्याला ऐकू येत होते. बहुदा ती गॅलरीत किंवा किचन मधून बोलत असावी. शब्द उमगत नव्हते, पण टोन कळत होता. कोणास तरी ती लाडे-लाडे बोलत होती. श्री च्या कपाळावर आठ्या पडल्या. "मनु" त्याने जरा वरच्या पट्टीतच हाक मारली. आपल्या ओल्या केसांना टॉवेल गुंडाळत मानसी बेडरूम मधून बाहेर आली. नुकतीच तिने शॉवर