माने , संभाळून राहा बरं ....झोपशील नाहीतर पाच- पाच खून केलेत त्यानं तुझा पण कार्यक्रम होईल म्हणून सांगतो..... ड्युटी वरती बदलून आलेल्या हवालदाराला , घरी जाणारा हवलदार सावधानतेचा इशारा म्हणून हे सांगत होता ..... पण त्याला हेच कळालं नाही की डायरी मध्ये फक्त तीन खूनांचा उल्लेख होता . मग पाच खून कुठून काढले . ' मी कधी केले ५-५ खून ' तो जाम वैतागला इथे काहीतरी भलताच घोटाळा होता. त्याच्या विचारांची चक्रे उलटी सुलटी धावत सुटली . त्याच्या मनात विचारांचा गोंधळ उडाला . तेव्हाच त्याला तो बदलून आलेला हवलदार म्हणाला .... का ओ भाऊ , जगावर एवढा कसला