मात - भाग ९

  • 14.5k
  • 8.7k

0सुहास २ मिनिटे अवाक झाला.. तिच्याकडून अश्या प्रतिसादाची त्याने अपेक्षाच केली नव्हती..रेवतीने सुहासच्या कानाखाली लावून दिली खरी पण नंतर ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागली..तिला तिच्या भावनांना आवर घालता आला नाही.. इतक्या दिवसाची घुसमट आणि अस्वस्थता तिच्या डोळ्यांवाटे बाहेर पडत होती..सुहासला रेवतीची एकंदरीत स्थिती पाहून आता पूर्ण खात्री पटली होती कि तिला सत्य परिस्थितीची जाणीव झालेली आहे.. त्याच उद्विग्न मनःस्थितीत नियंत्रणाबाहेर जाऊन तिने हा प्रतिसाद दिला असावा..आपल्या आजाराबद्दल हिला कळले म्हणजे प्रतीकला सांगायला भाग पाडले असणार रेवाने.. नाहीतर तो स्वतःहून सांगणे शक्यच नाही..प्रतीकने रेवतीला ते भेटले तेव्हा सगळे सांगितले होते.. "रेवती मन घट्ट करून ऐक.. ऐकल्यावर तुला त्रास होणार हे