उन्हाळ्याचे दिवस आणि घरातल्या उष्ण वाफा फेकणाऱ्या पंख्याखाली उभे राहता राहत आईच्या सूचना हा सोनेरी योग प्रत्येक घराघरात दिसून येतो.अपवादानेच एखादे किंवा बोटांवर मोजता येतील इतपत किंबहुना अशी दुर्मिळ घरं सापडतील.बाकी सगळीकडे घर घर की कहाणी आहे तीच ती आमच्याही घरी. मी घाईघाईत बाहेर निघाले.एकतर क्लासला जायला उशीर झालेला आणि इथे आईच्या की एक ना दुसरी कहाणी....तिच्या सूचना काहीकेल्या थांबत नव्हत्या. खरं म्हटलं तर आई हा असा उपवर्ग आहे की समोर कोणीही असो सूचनांचा पाऊस त्या व्यक्तीवर बरसणार नाही असे होणारच नाही.आणि सूचनांची सुरुवात कशीही आणि कुठूनही होऊ शकते.म्हणजे जरी बाहेर अगदी रम्य वातावरण असले तरीही बाहेर जाताना सांभाळून