पाठलाग – (भाग-१५)

(27)
  • 8.7k
  • 1
  • 4.8k

दोन महीन्यांनंतर – दिपक सकाळी जागा झाला तेंव्हा शेजारी स्टेफनी नव्हती. तो खोलीतुन डोळे चोळत चोळत बाहेर आला. स्वयंपाकघरातुन भांड्यांचा आवाज येत होता तसा तो स्वयंपाकघरात गेला. स्टेफनी त्याला पाठमोरी उभी होती. तो दबक्या पावलांनी तिच्या जवळ गेला आणि तिला एकदम मिठी मारली. “स्ट्युपीड्ड..”, दचकत स्टेफनी म्हणाली.. तसा दिपक हसायला लागला. व्हाईट शॉर्ट आणि बॉटल-ग्रीन रंगाच्या शर्टमध्ये स्टेफनी अधीकच आकर्षक दिसत होती. फिक्कट नारींगी रंगाच्या रिबीनीने तिने आपली पोनी-टेल बांधली होती. “काय करते आहेस..?”, दिपकने विचारले..“युअर फेव्हरेट..” असं म्हणत स्टेफनीने समोरच्या ताटामधील पिठ घेऊन दिपकच्या गालाला फासले.. “अस्सं..”, दिपक चिडुन म्हणाला आणि तो पिठ घ्यायला ताटलीकडे सरसावला. परंतु आधीच स्टेफनीने