पाठलाग – (भाग-१४)

(19)
  • 8.8k
  • 3
  • 4.9k

जेंव्हा दीपक आणि स्टेफनी दिल्लीला जायची तयारी करत होते तेंव्हाच युसुफ कोणाशीतरी बोलण्यात मग्न होत. युसुफचा चेहरा घामाने डबडबला होता. त्याच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट दिसत होती. नकळत तो हाताच्या बोटांची चाळवाचाळव करत होता. त्याच्या समोर बसलेली व्यक्ती मात्र कमालीची शांत होती. डोळ्यावर गॉगल असला तरीही त्या व्यक्तीची रोखलेली नजर युसुफला अस्वस्थ करत होती. “गुड वर्क युसुफ़.. “, बऱ्याच वेळाच्या शांततेनंतर ती व्यक्ती म्हणाली“थॅक्यू जॉनी भाय… “, युसुफ“थोडीपण होशियारी दाखवायची नाय कळला ना? माझा नेम कधीच चुकत नाही, माहितेय तुला~..” जॉनी“नाही भाई, तुम्ही जसे म्हणाल तसेच होईल सगले… “, युसुफ “चल निघ आता, तुझी जरूर पडली कि परत तुला बोल्वेन…”, जॉनी“भाई