युसुफला समोर बघुन दिपकला आश्चर्याचा धक्काच बसला होता. खुप दिवसांनी एखादा जुना मित्र भेटावा तसं दिपकने युसुफला कडकडुन मिठी मारली. त्या दिवशी जंगलात चुकामुक झाल्यावर दोघंही एकमेकांना भेटलेच नव्हते. युसुफचं पुढे काय झालं? तो पोलिसांच्या हाती लागला?, का त्यांच्या गोळीने मारला गेला?, का तो सुध्दा दिपकसारखा पळुन जाण्यात यशस्वी झाला ह्याची काहीच कल्पना त्याला नव्हती. “कहा था यार तु?”, दिपक युसुफला म्हणाला..“दुनिया छोटी है भाई!! वाटलं नव्हतं परत तुला भेटेन म्हणुन..”, हसत हसत युसुफ म्हणाला.. “खरंच, मलाही वाटलं नव्हतं की इतक्या लवकर तुला भेटु शकेन..”, दिपक म्हणाला..“अरे पण तु इथं कुठे?”, युसुफने मॉटेलकडे हात दाखवत विचारले, तसं दिपकला स्टेफनी, थॉमसची