पोलादी पुरुष : सरदार पटेल!

  • 15.5k
  • 1
  • 4.1k

गुजरात राज्यातील करमसद या गावात जव्हेरभाई पटेल हे गृहस्थ राहात होते. त्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय होता. जव्हेरभाई यांच्या पत्नीचे नाव लाडाबाई होते. लाडाबाईंचा स्वभाव प्रेमळ, परोपकारी होता. घरातील कामे सांभाळून त्या शेतीच्या कामातही लक्ष देत असत. त्या दोघांना चार मुले आणि एक मुलगी होती. ३१ ऑक्टोबर १८७५ यादिवशी या कुटुंबात अजून एक पुत्ररत्न जन्माला आले. या बाळाचे नाव वल्लभभाई असे ठेवण्यात आले. करमसद याच गावी वल्लभभाईंचे बालपण फुलले. शाळेत शिकताना त्यांना शेतात जाऊन काम करायला आवडू लागले.