पाठलाग – (भाग- ८)

(22)
  • 9.4k
  • 3
  • 5.1k

त्या गजबजलेल्या वस्तीतील एका मोडक्या मेंन्शन मध्ये जमलेल्या त्या तिघा-चौघांच्या नजरा दरवाज्याकडे वळल्या जेंव्हा दरवाज्यातुन एक चिकना तरुण आतमध्ये आला. त्याच्या चालण्यात एक विलक्षण आत्मविश्वास होता. आरमानी जिन्स आणि स्पायकर जिन्सचा अर्धा खोचलेला निळा जिन्सचा शर्ट त्याने घातला होता. हातामध्ये एक स्टीलचे ब्रेसलेट होते, शर्टची वरची दोन बटणं उघडी होती आणि त्यातुन यु.एस.ए चे मराईन्स सोल्जर घालतात तसले एक लॉकेट डोकावत होते. डोळ्यावर गडद रंगाचा गॉगल होता. जॉनी आतमध्ये आला तसे सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. आणि अर्थात त्याचे इथे येणे अपेक्षीतच होते. बॉसच्या मर्जीतला आणि शार्प शुटर जॉनीला बोलावणं धाडण्यात आलं होतं. बॉसचा भाऊ, इस्माईल मारला गेला होता.. माफीया डॉनचा