“गुड बाय धोंड्या…” दिपक स्वतःशीच पुटपुटला. मनगटावर जोर देऊन त्याने खांदा वर उचलला आणि बंदुकीची नळी बरोब्बर सेट केली. तो कुठल्याही क्षणी ट्रीगर दाबणार इतक्यात त्याच्या काहीतरी लक्षात आले. तो परत सावकाश पहील्यासारखा गवतात खाली झोपला. त्याने बंदुक आपल्या कानाशी आणली आणि हलकेच हलवली. आतुन बारीक किण-किण आवाज आला. इस्माईल खाली कोसळला तेंव्हा त्याची बंदुक शेजारच्या खडकावर पडली होती आणि त्यामुळे बंदुकीच्या आतील स्प्रिंग लुज झाली होती. दिपकने सैन्यात असताना अश्या कित्तेक बंदुका हाताळल्या होत्या आणि असे अनेक बारीक-सारीक प्रॉब्लेम त्याला माहीत झाले होते. आत्ता जर त्याने ट्रीगर दाबले असते तर गोळी सुटली नक्की असती, पण तिने अपेक्षीत वेध नक्कीच