२७. महाराष्ट्रातील किल्ले- भाग २ महाराष्ट्रात बरेच किल्ले आहेत. त्यातल्या प्रसिद्ध किल्ल्यांची माहिती- १. रायगड -‘रायगड’ हा शिवकाळातील महत्त्वपूर्ण किल्ला आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६४ मध्ये हा गड बांधून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड! छत्रपती शिवाजी महाराज यांचा शके १५९७, आनंदनाम संवत्सर, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, शनिवार ६ जून, १६७४ रोजी जो राज्याभिषेक झाला आणि तो या रायगडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसन रायगडावरच झाले. म्हणून या गडाला विशेष महत्त्व प्राप्त