मुंबईच्या दादर परिसरातला उच्चभ्भू परिसर... भर मे महिन्याचे दिवस. आजी संध्याकाळच्या दिवेलागणीची तयारी करत असतानाच रोज काका यायचे. मोगरे वासवाल्ले....... बंगल्याच्या टोकाशी हाक ऐकू आली की मनूला कोण आनंद होई... आजी... काका आले.....बंगल्याच्या वरच्या मजल्यावर मनू राही.मनू आजी,बाबा आणि आई. आजी म्हणजे मनूच्या आईची आई.आई आणि बाबा अजून घरी यायचे असत.मनूला हाका मारून मारून आजी थकून जाई.चला घरी.दिवसभर हुंदडणं झालय रोजचंच तुम्हा मुलांचं.चला आता तिन्हीसांजेला घरात या.... काहीशा नाराजीनेच मनू घरात येई.हात पाय धुते न धुते तोच काकांची हाक कानी पडे...धावत मनू गॅलरीत येई आणि काकांना अंगणाच्या फाटकापासून घरापर्यंत येताना पाहत राही.पांढरं धोतर,वर सदरा,डोक्याला पागोटं,कपाळी गंध,पायात वहाणा आणि गळ्यात तुळशीची