फुलाचा प्रयोग - 17

  • 6.1k
  • 2.1k

सैतानाने माधवाला एका दूरच्या देशात नेले. त्या देशाच्या राजधानीतून ते हिंडत होते. त्यांच्या मूर्ती सर्वाच्या डोळयांत भरतील अशा होत्या. जो तो त्या दुकलीकडे बघे. जशी भीमार्जुनांची जोडी परंतु सरकारी अधिकार्‍यांना त्यांचा संशय आला. पोलिसांनी त्यांना पकडून नेले. राजासमोर त्या दोघांना उभे करण्यात आले.