भारती “एकसाथ राष्ट्रगीत शुरू कर ...” या सरांच्या वाक्यासरशी भारती शाळेत शिरली . साडे दहा वाजायला फक्त दोन मिनिटे शिल्लक होती . चटकन जाऊन भारती मुलींच्या रांगेत उभी राहिली आणि तिने राष्ट्रगीत म्हणायला सुरवात केली . मनातून तीला अगदी हायसे वाटले ,शाळेत वेळेत पोचल्या बद्दल . शेजारी कमल तिची मैत्रीण उभी होती ती हसली आणि कुजबुजत म्हणाली “बर झाल आलीस लवकर नाहीतर आज पण बोलणी खाल्ली असतीस बाईंची “ भारती ओशाळली .”.हो ग ..अगदी धावत पळत आले बघ ..” अग पण तू वेळेत का निघत नाहीस घरातून ? “रोज काही तरी कारणाने उशीर करतेस,