मात भाग ८

  • 14.8k
  • 8.8k

रेवती अगदी बधीर झाली होती ते सगळे ऐकून.. प्रतीकला रेवतीची अवस्था पाहून खरे तर काय करावे ते सुचत नव्हते.. फार मोठा आघात झाला होता तिच्या मनावर.. हेच टाळण्याचा प्रयत्न तो आणि सुहास गेल्या कित्येक दिवसांपासून करत होते.."सांभाळ स्वतःला.. चल निघू या का?" प्रतीकअंगात बळेच अवसान आणून कसेतरी रेवती तिथून बाहेर पडली..प्रतीक गेल्यावर रेवती तिच्या गाडीजवळच शुन्यात.. विचारांच्या गर्तेत हरवलेल्या अवस्थेत उभी होती.. खरंतर तिला जे ऐकले त्यावर विश्वास बसत नव्हता.. किंबहुना तिला त्यावर विश्वास ठेवायचा नव्हता असे म्हणावे लागेल.. तिच्या गाडीच्या शेजारी उभी असलेली गाडी पार्किंग मधून बाहेर काढत असणाऱ्या माणसाने हॉर्न वाजवल्यावर रेवती भानावर आली..तिला काही केल्या होस्टेलवर जाण्याची