स्त्री जन्माची सांगता (भाग -9)

  • 4.9k
  • 1
  • 1.9k

_____________________आई म्हणजे आई असतेआई म्हणजे आई असते , भिरभिरत्या नजरेची ती वनराई असते ...गोठ्यात वासरांना चाटणारी ,चिमणीच्या चोचीत चारा आणून भरवणारी ठेच लागतास बाळाला धावत जाऊन कडेवर घेतं गोजरनारी ती माय माऊली असते ....तिच्यामुळेच सुंदर सृष्टी आमच्या लोचनी पडते , आई काय असतेना ! तळघरात आपल्या साचलेला मळभ .... तिच्या भोवती रेंगाळतो सुखावतो गोठयात खुंट्याला बांधून ठेवलेलं पाडस ते गाईचं आईच्या आठवणीत रवंथ गाळत फिरतो ... आपली ही त्या मुक्या जीवासारखीच गत होते त्या पाडसाला हंबरून ओरडता येते आपण न हंबरडा फोडता ठेच लागल्यावर निदान आई गं .... तरी म्हणतो . आईची कुशी साऱ्या सजीवसृष्टीची उशी ..! तिच्या कुशीत शिरताच सारी दुख: काळजी क्षणभरात वजा होते