‘आईला देऊ हे औषध?’ मधुरीने विचारले ‘दे. पेलाभर पाण्यात हया बाटलीतील चमचा दोन चमचे औषध घाल. गाढ झोप लागेल. खोकला उसळणार नाही. तू येशील ना रात्री?’ ‘हो.’ मधुरी औषधाची बाटली घेऊन गेली. ‘आज रात्री गंमत आहे एकूण!’ सैतान म्हणाला. ‘चूप. खबरदार असे काही बोलशील तर!’ माधव चिडून बोलला. रात्र झाली. मधुरीचा भाऊ घोरत होता. तिची आई खोकत होती.