इश्क – (भाग २६)

(17)
  • 7.3k
  • 3.1k

“रोहन.. मी जरा रतीच्या घरी चाललो आहे..”, टेबलावरुन कारची किल्ली उचलत कबीर म्हणाला“घरी? का रे? काय झालं?”, रोहन“अरे दोन दिवस झाले.. तिचा फोन बंद येतोय, व्हॉट्स-अ‍ॅपपण लास्ट-सीन दिन दिवसांपूर्वीचेच आहे..”, कबीर“कबीर..”, कबीरला थांबवत रोहन म्हणाला.. “मला वाटतं ती अपसेट असेल.. त्या दिवशी तु तिला एकटीला सोडुन राधाच्या मागे निघुन गेलास…”“अरे पण मी आलो ना परत.. आलो तेंव्हा निघुन गेली होती ती.. मी काय करणार मग?”, रोहनचं वाक्य तोडत कबीर म्हणाला..“हम्म.. पण मला वाटतं..” पण कबीर त्याच्या बोलण्याची वाट न बघता निघुन गेला होता. रतीच्या घराचं दार रतीच्या आईनेच उघडलं.. “काकु.. रती आहे घरी?”, कबीर“नाहीए..”“अं.. कुठे गेलीए.. तिचा फोन पण बंद