निराशेला खोल दरीत भिरकावून माधव तेथे बसला होता. ‘अस्तास जातानाही सूर्य लाल आहे, मरतानाही झगडत आहे. मलाही झगडू दे -’ असे त्याच्या मनात आले. आता जरा अंधार पडला परंतु थोडया वेळाने चंद्र वर आला. सुदर चांदणे पडले. माधव घरी जाण्यासाठी निघाला. इतक्यात त्याच्या पायाशी एक कुत्रे आले. कोठून ते आले? एकदम कसे आले?