जत्रा - एक भयकथा - 2

(16)
  • 16.5k
  • 1
  • 10.8k

   तुम्ही जर मागील भाग वाचला नसेल तर माझ्या प्रकाशित साहित्य मध्ये जाऊन अवश्य वाचा.......                      जत्रा ( एक भयकथा ) भाग 2           दिवसाउजेडी माणसाने कितीही फुशारकी मारली की आपण कशाला भीत नाही भूत असो नाहीतर काहीही असो मात्र रात्री अंधार पडल्यावर साऱ्यांचीच बोलती बंद होते . गण्याने कितीही मोठ्या बाता मारल्या असल्या तरी त्याच्या अंतर्मनात कुठेतरी भीती आपले पाय पसरवत होती. पाद्र्याची वाट ही काही वर्दळीची वाट नव्हत गाडीवाट असली तरी चाकाच्या 2 चाकोरीपुरतीच वाट राहिली होती बाकी सगळीकडे रानटी झाडे झुडपे माजली होती त्यामुळे जंगलात आल्यासारखं वाटत होतं . पायाखालचं वाळून गेलेलं गवत पाय पडल्यावर चुरचुर