इश्क – (भाग २५)

(17)
  • 9k
  • 2
  • 3.3k

कबीरची झोप मोडली ते केंव्हापासुन वाजणार्‍या फोनच्या आवाजाने. आदल्या दिवशी रात्री नातेवाईकांचा सगळा गोतावळा लग्नासाठी येऊन थडकला होता. सगळ्यांना भेटून, गप्पा-टप्प्पांमध्ये कबीरला झोपायला मध्यरात्र उलटुन गेली होती. त्याने घड्याळात बघीतले, ८च वाजत होते. काही सेकंदांनी पुन्हा फोन वाजु लागला. वैतागुन त्याने फोन उचलला… “कबीर.. ए कबीर.. अरे झोपलाएस का?”, पलीकडुन राधा फोनवर ओरडत होती..“राधा? हा कुठला नंबर आहे तुझा…?”, कबीर राधाचा आवाज ऐकताच खडबडुन जागा झाला..“काय करतो आहेस?”, त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन राधा म्हणाली..“झोपलोए.. सकाळी झोपेतच असतात बहुतेक लोकं..”“पेपर बघीतलास आजचा?”, राधा“मी झोपलोय म्हणलं तर! झोपेत वाचेन का पेपर…”“बरं बरं.. व्हेरी गुड.. एक काम कर, पट्कन एम.जी.रोड वर ये.. तुला