स्त्री जन्माची सांगता ( भाग -6)

  • 6k
  • 2k

नादिया मुराद(Female)आणि देनिस मुक्वैगी(Male)ह्यांना संयुक्तपणे २०१८चा नोबेल शांतता-पुरस्कार जाहीर झाला आहे.नादिया मुराद (जन्म १९९३,age-25) ह्या इराकमधील यझिदी समाजातील मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. त्या २०१६ पासून मानवी तस्करीतील बचावलेल्यांच्या सन्मासाठीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छादूत आहेत.नादिया मुराद ह्या इराकमधील कोचो ह्या गावात जन्मल्या. त्यांचे कुटुंब शेतकरी होते. त्या उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेत होत्या आणि इतिहास ह्या विषयाचे शिक्षक बनण्याची आणि रंगभूषाकार बनण्याची त्यांची इच्छा होती. ३ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांच्या गावावर आयसिसने हल्ला केला. नादिया ह्यांच्या ९ भावांपैकी ६ जण जागच्या जागी मारले गेले. हजारो महिला आणि मुले ह्यांसह नादिया आणि त्यांच्या दोन बहिणींना गुलाम म्हणून कैद करण्यात आले. त्यांच्यावर धर्मांतर लादण्यात आले.