फुलाचा प्रयोग - 11

  • 6.7k
  • 2.6k

परंतु सर्वज्ञ माधव आज असमाधानी होता. इतक्या वर्षात असे असमाधान त्याला कधी वाटले नव्हते. तो नेहमी पुस्तकांत रंगलेला असावयाचा परंतु आज पुस्तके नि:सार वाटत होती. जी पुस्तके वाचता-वाचता इतकी वर्षे तो घामाघूम झाला, त्या पुस्तकांत काडीमात्र राम नाही असे त्याला वाटले. तो शून्य दृष्टीने दिवाणखान्यातील त्या ज्ञानभांडाराकडे बघत होता.