मात भाग ६

  • 15.3k
  • 9.1k

रेवतीची रिक्षा एक स्थिर सुरक्षित अंतर ठेवून सुहास आणि प्रतीकच्या दुचाकीचा पाठलाग करत होती..अंतर कापले जात होते खरे पण रेवती जागीच थिजल्या सारखी झाली होती.. रेवातीचे हातपाय थरथरत होते.. रिक्षात बसल्या बसल्या विचारांच्या आहारी जाऊन ती आपल्या नखांचे चर्वण करत होती.. मधेच दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंतवून हनुवटीला लावत होती.. मधेच मोबाईल बघत होती.. मधेच रिक्षाच्या पुढच्या काचेतून सुहास आणि प्रतीक यांना घेऊन चाललेली दुचाकी दृष्टीक्षेपात आहे का याची खात्री करत होती..त्या दोघांना जर कळले की मी त्यांचा पाठलाग करत होते तर काय वाटेल त्यांना..? आपण बरोबर तर करत आहोत ना..?खरे पाहता ही एक आयती संधीच चालून आली होती रेवतीकडे