वृध्द आत्या घरी होती. एक दिवस सारे चांगले होईल हया आशेवर ती जगत होती. फुलाच्या बागेची काळजी घेत होती आणि एके दिवशी फुला घरी आला. एकटा नाही आला, तर त्याच्या बरोबर कोणी तरी होते. ‘आत्या, ओळखलेस का मला?’’ फुला पाया पडून म्हणाला. ‘अरे, तुला का मी ओळखणर नाही? आलास ! मी म्हणतच होते की, तू येशील. किती रे वाळलास? तुरूंगातून जिवंत आलास हीच देवाची कृपा. आणि ही कोण?’