“काय रोहन शेठ.. कशी होती कालची संध्याकाळ?”, रोहन ऑफ़ीसला येताच कबीर म्हणाला..“मस्त.. कबीर.. तु खरंच चिडला नाहीस ना?”, रोहन“नाही अरे.. मी का चिडु? खरंच मला आनंद झाला.. तुम्ही दोघंही अनुरुप आहात एकमेकांना..”“आम्ही ठरवलं होतं तुला सांगायचं.. पण समहाऊ योग्य अशी वेळच मिळत नव्हती..”“असु दे अरे.. तुम्ही दोघं खुश आहात ना.. मग झालं…”“बरं आमचं जाऊ देत.. तुझं बोल.. तुझी संध्याकाळही चांगली गेलेली दिसतेय.. ती बरोबरची छानच होती.. रती ना?”, रोहन“हम्मं.. खरंच छान आहे अरे ती.. इतकी मस्त बोलते ना.. खरं तर तिनेच माझी संध्याकाळ छान बनवली..”, असं म्हणुन कबीरने त्या संध्याकाळबद्दल रोहनला सांगीतलं.. “तुला आवडलीय ती .. हो ना?”, कबिरकडे बघत