स्त्री जन्माची सांगता ( भाग -2)

  • 8.5k
  • 3k

नाचणं म्हणजे एक कला ती इतर कलेसारखीच साऱ्यांनाच अवगत नसते .... पण , केलेला कला म्हणून न बघता आपला हा समाज धंदा म्हणून बघतो आणि नाचणारींनला धंदेवाली ... शेवंताचा जन्म तसा कोल्हाटी समाजात झालेला . ती शाळेत शिकायला जाई तेव्हा सारा वर्ग तिला कोल्हाटनी म्हणूनच हाका मारत . अभ्यासात रमणारी शेवन्ता कधी कधी विचाराच्या घागरीत बुडून जातं आणि स्वतःशीच पुटपुटत राही , " कोल्हाटणी म्हणजे नाचणारीचं का ?? " हा च प्रश्न घेऊन ती तिच्या आई जवळ गेली आणि तिला म्हणाली , " माय , ये माय कोल्हाटीण म्हणजी नाचणारीचं काय ?" तिचा प्रश्न ऐकत सखूलाही वाटलं ह्या लहानग्या पोरीला का समजणं नाचणं आणि कोल्हाटणीचा जन्म