इश्क – (भाग २०)

(17)
  • 8k
  • 1
  • 3.3k

कबिर मेन्यु-कार्ड बघण्यात मग्न होता तेंव्हा त्याच्या समोर एक नेपाळी किंवा तत्सम दिसणारी एक मुलगी येऊन उभी राहीली. तिच्या हातामध्ये पिवळ्याधम्मक लिली फुलांचा एक मोठ्ठा गुच्छ होता. कबिरने प्रश्नार्थक नजरेने रतीकडे बघीतलं. रती हसत उभी राहीली आणि तिने तो गुच्छ त्या मुलीकडुन घेऊन कबिरच्या पुढे धरला.. “हे घे.. तुझ्यासाठी…”“अगं गेस्ट तु आहेस, मी नाही..”, उठुन उभं रहात कबीर म्हणाला..“घे रे.. एका मोठ्या लेखकाला भेटतेय.. एव्हढं तर करायलाच हवं ना?”“ओहो… मोठ्ठा लेखक म्हणे… थॅंक्स.. मस्त आहेत फुलं..”, आधी रतीकडे आणि मग त्या मुलीकडे बघत कबीर म्हणाला.. “थॅंक्यु सर..मॅडमने सांगीतलं होतं, फुलं चांगलीच हवीत.. आजचा स्पेशल डे आहे…”, ती मुलगी हसत हसत