२४. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ६ राजस्थान प्रेक्षणीय स्थळे- ५. जोधपुर- द ब्लू सिटी जोधपुर ह्या जागेला गेटवे टू थर सुद्धा म्हणले जाते. जोधपुर निळ्या इमारतींसाठी, तिथल्या मिठाई, किल्ले, शानदार महाल आणि मंदिरे ह्यांसाठी पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. इथे बरीच घरे निळ्या रंगात आहेत त्यामुळे जोधपूरला ब्लू सिटी सुद्धा म्हणले जाते. इथे सूर्य नेहमीच तळपत असतो त्यामुळे जोधपुर ला सूर्य नगरी सुद्धा म्हणले जाते. जोधपुर राजस्थान मधले दुसरे मोठे शहर आहे. आणि इथली लोकसंख्या १० लाखांच्या वर आहे त्यामुळे जोधपुरला महानगर म्हणून घोषित केले गेले. २०१४ मध्ये जोधपुर ला मोस्ट एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेसेस ऑफ़ द वर्ल्ड मध्ये प्रथम स्थान