लिली आता सासरी राहते परंतु ती रोज वालजीकडे जाते. त्यांना जेवण नेते. त्यांच्याजवळ बोलत बसते. कधी कधी बरोबर दिलीपही असतो परंतु वालजीचे दुर्दैव अद्याप सरले नव्हते. एके दिवशी दिलीपकडे एक गृहस्थ आला. 'काय पाहिजे आपणाला?' दिलीपने विचारले. 'तुमच्याशीच खाजगी बोलायचं आहे,' तो नवखा म्हणाला. 'चला, वर बसू.' दोघे वर गेले. एका खोलीत बसले. तो नवखा बोलू लागला.