इश्क – (भाग १६)

(14)
  • 8.1k
  • 3.6k

ईटरनीटी…ए प्युअर ब्लिस्स… तो क्षण किती वेळाचा होता दोघांनाही ठाऊक नाही.कदाचीत काही सेकंद..कदाचीत एखादा मिनिटं..कदाचीत कित्तेक मिनिटंही… जणू सर्व काळ त्या क्षणापुरता थांबुन गेला होता. समुद्राच्या लाटा, वार्‍याच्या झुळुकीने हलणार्‍या नाराळाच्या झाड्यांच्या झावळ्या, एकसंध आकारात उडणारे पक्षांचे थवे.. सर्व काही.. राधा आणि कबीर भानावर आल्यावर एकमेकांपासुन दुर झाले.“वॉव्व.. आय… आय नीड अ बिअर…”, खाली मान घालुन कपाळ चोळत कबीर म्हणाला..“का रे? टेस्ट आवडली नाही का?”, पहील्यासारखेच खळखळुन हसत राधा म्हणाली..“तु ना.. खरंच.. अशक्य आहेस…” कबीर..“तु मला ओळखलं कुठे आहेस अजुन? चल जाऊ या? उशीर होतोय.. अजुन ६ तासाचा ड्राईव्ह आहे…”, असं म्हणुन राधा कारकडे जाऊ लागली. कबिर अजुनही तिच्या पाठमोर्‍या