गुरुजी, आज काय लवकर शाळेत आलात? होय ,आज आमच्या साहेबांची शाळेला भेट आहे, वार्षिक तपासणी आहे , शाळेच्या शेजारी राहणाऱ्या दत्ता तात्यांनी देशमुख गुरुजीना प्रश्न विचारला. दत्ता तात्या नेहमी शाळेच्या शिक्षकांवर नजर ठेवून असायचे. मोडक्या पान टपरी खाली आपल्या थोड्या पांढरया काळ्या मिशीला पीळ देत , आपली पांढरी विजार धुळी पासून सांभाळण्या साठी खांद्यावर टॉवेल घेऊन, येणाऱ्या-जाणाऱ्या हाक मारत ,आपल्या उतारवयात वेळ घालवण्याचा त्यांचा नेहमीचा छंद . वाडीतील मुले असो वा तरुण पोरं सर्व त्यांना 'तात्या' म्हणूनच हाक मारायची. शाळेच्या कार्यक्रम असो अथवा गावातील सार्वजनिक कार्यक्रम तात्या हजर असत . त्यांचा चौकसपणा खूपच होता कुठलाही गावातील कार्यक्रम त्यांच्याशिवाय