सुस्नात मल्लिका केस बांधून झर्याच्या बाहेर पडली.तिचा प्रसन्न चेहराच सांगत होता की आज काही विशेष दिवस आहे.मल्लिका एक भिल्ल कन्या. लहानपणापासून जंगलातच लहानाची मोठी झालेली.भगवान शंकरावर तिचा फार जीव! त्यांची आराधना करण्यात तिला आनंद वाटे. लहान असताना रानफुले आणि बेलाची पाने ती शंकराच्या पिंडीला वाही.कुणा एका वाटसरुने जंगलात एका दगडावर ती पिंड ठेवली होती. मल्लिकेच्या काकाने ती पाहिली आणि सर्व जमातीने मिळून भोळ्या सांबाला एका मंदिरात स्थापन केलं. महिनाभर राबून मातीचंच सुंदर शिवालय उभारलं. तेव्हापासून आपल्या भिल्ल जमातीचा उद्धार करणार्या शिवाची उपासना होऊ लागली.कुणी एक भला आश्रमीय त्या वाटेने जाताना एक रात्र देवळात विसावला.भिल्लांनी त्याचा सत्कार केला.रात्री त्या ऋषिने त्यांना