“गुड मॉर्निंग रोहन..”, ऑफीस मध्ये आल्यावर कबिर म्हणाला.. रोहनने मात्र काही उत्तरच दिले नाही, संगणकावर तो काम करण्यात मग्न होता. “रोहनss… गुड मॉर्नींग…”, कबिर पुन्हा एकदा म्हणाला..“गुड मॉर्निंग…”, रोहन “का रे? असा उदास का? काय झालं?”, कबिर“काही नाही असंच..”“तब्येत बरी आहे ना?”“हम्म…”“बरं.. आपल्या पुस्तकाच्या सेल्सचा रिजनल रिपोर्ट घेउन जरा केबिनमध्ये येतोस का?.. बघु अजुन कुठे कमी सेल्स असेल तर तेथे प्रमोट कसं करता येईल…”, कबिर“मी मेल करतो फाईल..”, रोहन कबिरने जरावेळ रोहनकडे रोखुन कडे बघीतले आणि मग तो ठिक आहे म्हणुन केबिन मध्ये निघुन गेला. रोहनचे काय बिनसले होते कुणास ठाऊक, पण त्याला मुळपदावर यायला दोन दिवस लागले. काहीतरी फॅमीली