इश्क – (भाग १४)

(18)
  • 7.8k
  • 2
  • 3.7k

कबिरला पुढे काय बोलावं तेच सुचेना. तो नुसताच फोन कानाला लावुन बसुन राहीला..“हॅल्लो.. आहेस का?”“हो.. आहे आहे..”, राधाच्या आवाजाने तो भानावर आला बहुदा राधाला सुध्दा पुढे काय बोलायचे हे सुचेना, त्यामुळे काही क्षण शांततेत गेले. “कशी आहेस?”, कबिरने विचारले“टी.व्ही. बघतोस ना? मग माहीती असेलच की मी काय काय दिवे लावलेत ते..!”, काहीसं हसुन राधा म्हणाली..“तुझीच चुक आहे.. काय गरज होती त्या दिवशी असं अचानक निघुन जायची. मला थोडा वेळ दिला असतास तर….”“हे बघ कबिर.. जुन्या गोष्टींबद्दल बोलुन काय उपयोग.. जे झालं ते झालं.. लेट्स मुव्ह ऑन…”“राधा, मला भेटायचंय तुला.. प्लिज नाही म्हणु नकोस.. तु म्हणशील तेथे, म्हणशील त्या हॉटेलमध्ये…”“मला पब्लिक-अटेंन्शन