मैत्रीण भाग १

  • 21.5k
  • 2
  • 10.8k

मैत्रिण.... मैत्रिण... बराच दिवस विषय मनात रेंगाळत होता. खुपदा अस वाचनात आलाय की, आयुष्यात एखादी तरी मैत्रीण ही असावीच. तिने आपल्याशी बोलाव,हसावं, उगाच चालावं, आपल्याला समजून घ्यावं. अनेकांची मैत्रिण ही त्यांची बहीण असते. पण तिथेही मर्यादा येतातच की. आता आमचं म्हणाल तर मला ही अस वाटायचं की, आपल्याही आयुष्यात एखादी मुलगी मैत्रिण म्हणून असायला हवी. आता अस म्हणून मी माझ्या मित्रांना कमी लेखत नाही. जिवाभावाचे माझेही काही मित्र आहेत. पण एखादी मुलगी मला आवडली तर हे साले तिच्यावर लाईन मारतात. इतके ते बारा xxx {तीन फुल्यांचे} आहेत. मग अशा ठिकाणी एक मैत्रीण असणं नितांत गरजेचं असतं. माझे काही मित्र असे