ऋण अनुबंध

  • 3.9k
  • 1
  • 1.1k

मृण्मयीला आज खूप कंटाळा आला होता. डिसेंबरची सुखद गारेगार दुपार होती. मैत्रिणीकडे काल रात्री राहून आज दुपारचं जेवण तिकडेच उरकून ती घरी परतली आणि अर्ध्या तासातच कंटाळली.आई बाबा दोन दिवस बाहेरगावी गेले होते आणि त्यामुळेच मृण्मयीला कंटाळा आला होता. सगळेच मित्र मैत्रिणी कुठेनाकुठे जाणार होते त्यामुळे आपण एकटीनेच काय करायचं अख्खी संध्याकाळभर असा गहन प्रश्न तिला पडला होता.रात्री उशिराने सुकन्या येणार होती सोबतीला तिच्या पण तोपर्यंत काय?मूव्हीला जाउया??? पण एकटीने!!! नकोच.मग तुळशीबागेत फेरफटका??? मागच्या रविवारी तर जाऊन आलो आपण...घरात बसून टीव्ही पाहूया??? छे.अत्यंत कंटाळवाणा उद्योग...तिने विचार केला चला आज मस्तपैकी एकटीनेच माॅल फिरायला जाऊया.येताना तिथूनच पार्सल आणू. सुकन्या येईल म्हणून