लिव इन चा फंडा जसं वय वाढत जातं बालपणाला दुर सारत तारूण्याच्या उबंरठ्यावर पाऊले पडू लागतात ..मनाची घालमेल होते .... हार्मोन्स उसळू लागतात ... चुक की बरोबर काहीच कळत नाही अल्लड वय असतं ना ते ! प्रेम वैगरे फार कमी जपतात हो अधिकतर आकर्षणालाच बळी पडतात ...न समजलेल्या प्रेमाच्या काहाण्या पण फार करूण आहेत ... त्यात ही दोघे ह्यांना हेच समजून घ्यायला तयार नाही तर आपण काय समजून घेऊ ?? " निमिशा अगं ये ऐक ना माझं , का असा अट्टाहास करते नको जाऊ ना मला सोडून दुर ..... तुझ्याविणा इकडे मला सारं काही भकास वाटेल गं ..."विनयचा आपला लागलीच सुर निमिशाला जाण्यापासून थांबवत होता ...तळ्यात