अगदी काल परवा मला गावी जाण्याचा योग जुळून आला होताकारण निमित्त तसे फार चांगले होते वाशिम येथे एकदिवशीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाचेम्हणूननच की काय मी नेहमी पेक्षा यावेळेस गावी जातांना थोडा आनंदीच मूडमध्ये होतो कधीच कानात हेडफोन न वापरणारा आज मात्र कानात सुमधूर गीतांना एकुण प्रवासाचा आनंद द्विगुणित करत मी माझे जन्म गाव तांदळी (शेवई) जवळ करत होतो गावी येतांना कासोळा फाटा लागताच मला माझ्या काँलेज जिवनातील आठवणी जाग्या झाल्या होत्यासकाळी सकाळी पावसाळ्यात पाऊस हिवाळ्यात थंडी व उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा सहन करत सकाळी साडेसहाच्या सुमारास तांदळीवरुन अकरा किलोमीटरचा हा प्रवास आम्ही पाच सहा मित्र सायकलवर टांग टाकून शक्य होईल तेवढ्या लवकर कासोळा येथील