हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 2)

  • 7.9k
  • 3
  • 3.6k

प्रेमाला वय नसतं असं म्हणतात हे खरंच असावं . बालपणीच ते अल्लड वयात झालेलं प्रेम तरूण पणात मिळणं म्हणजे खरचं किती अल्हादायकच ना जणू काही सारी सृष्टी आपल्यावर प्रेम सुमनाचा वर्षाव करीत असल्याचे भाकीत ... जया ही आठवीत शिकणारी मुलगी ती ही ह्या तारूण्याच्या उबरंठ्यावर आपले पहिले चरण ठेवताना कुणाच्या तरी प्रेमात पडते ... कोण असावा तो खुशनशीब जयाचा राजकुमार ?? दुसरा तिसरा कुणीही नाही तो तिचा सख्खा आतेभाऊच होता दिनेश ... जयाला आईसोबत मंदिरात जाण्याची आवड ती मंदिरात जाऊन दिनेशचा नावाचा तिथे शिक्का आपल्या अंगठ्याने लावते . जेव्हा तिची ही वेडीभाबडी कृती तिचा आईला समजते तेव्हा तिची आई तिला विचारते