२०. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्ज .. २

  • 7.8k
  • 2.6k

२०. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्ज .. २ राजस्थानातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती- १. जयपूर-पिंक सिटी राजस्थानची राजधानी असलेले जयपूर शहर म्हणजे गुलाबी रंगांच्या विविध छटा घेऊन नटलेले शहर आहे. म्हणूनच जयपूर ला पिंक सिटी म्हणून ओळखले जाते. जयपूर मध्ये पाय ठेवताच कोणत्यातरी भव्य पुस्तकातून सगळ्या गोष्टी बाहेर पडल्या आहेत अस वाटल्या शिवाय राहणार नाही. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणुनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या संस्थानाचेही राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना इ.स. १७२८ मध्ये दुसऱ्या महाराजा जयसिंह यांनी केली. जयपूर शहर येथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. जयपूरची आधुनिक शहरी योजना केलेल्या व्यवस्थित शहरांमध्ये गणणा होते. अप्रतिम राजमहाल, पर्वतमाथ्यांवर असलेले मजबूत किल्ले, शहराच्या भोवती असलेला